अकोला : नाफेडनं शनिवारी राज्यातली सर्व तूर खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो क्विंटल तूर बाजारात असतानाही खरेदी थांबवण्यात आली आहे. अकोल्याच्या बाजार समितीत शेवटच्या दिवसापर्यंत तुरीच्या 594 गाड्या रांगेत होत्या.


रात्री साडेआठ पर्यंत तुर खरेदी सुरू होती. खरतर शेतक-यांच्या रेट्यामुळे साडेआठपर्यंत केदंर् सुरू ठेवण्यात आलं होतं. अंदाजे 70 हजार क्विंटल तूर अकोल्याच्या बाजारात खरेदीविना पडून आहे. त्यामुळं आता याचं करायचं काय असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.