नाशिकमधील तीन पूल वाहतुकीस बंद
जिल्ह्यातले तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक केल्यामुळे या तीन पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यातले तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक केल्यामुळे या तीन पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे नांदगाव, पिंपळगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ परिसरातील अनेक गावे यामुळे मुख्य रस्त्यापासून संपर्कहीन झाली आहेत. बससेवेवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे कुचंबणा होत आहे.
अखेर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. अधिका-यांनी मात्र वाहतूक पूर्ण बंद करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असे स्पष्ट केले.