नागपूर : सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारला डोरेमॉन म्हणणारे विरोधक मोगली असल्याची खोचक टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्ष प्रगल्भ नाही, अजूनही ते डोरेमॉन, पोकेमॉनमध्ये अडकलेत अशी टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. नगर पालिका निवडणुकात फुल खिला है म्हणूनच विरोधी पक्ष मोगली हुआ है, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका बाजी केली. 


त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा समर्थन केले. नोटाबंदीचा निर्णय हा देशाच्या हितासाठी घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर चलनबंदीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यांना मदत करु मात्र विरोधी नेत्यांचे नुकसान झाले असल्यास काही करु शकत नाही असेही पुढे मुख्यमंत्री म्हणाले.