नागपूर : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर इथं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय. मुंबई पालिका निवडणुकीत युतीबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. मात्र याचवेळी मुंबईत भाजपची ताकद वाढली असून जास्त जागांवर भाजप दावा करेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.


मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असावा असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका केली.


एमएमआरडीएच्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कामं आम्ही करतो असं त्यांनी म्हटलंय.. मुंबई महापालिकेला पैशाचा प्रश्न नाही त्यामुळे चांगली कामं व्हायला हवीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.