नागपूर : नागभूषण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोंडसूख घेतलंय. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होईल तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली असं मुख्यमंत्री म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागभूषण फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांना नागभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील विकास प्रकल्पांच्या मुद्द्यावरुन नेहमीच शिवसेनेची भजपसोबत खडाजंगी होते अशातच मुख्यमत्र्यांनी भाषणातून सोडलेले बाण शिवसेनेच्या दिशेने आहेत का अशी चर्चा रंगू लागलीये.. 


ऑक्टोबर 2014मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा मुंबईतील अनेक विकास प्रकल्प फायलींमध्ये धूळखात पडले होते. अनेक वर्षे परवानग्याच मिळत नव्हत्या. मात्र मुंबईचे सीसी टीव्ही प्रकल्प, रेल्वे वाहतुकीचे आधुनिकीकरण आणि ट्रान्सहार्बर लिंक या सर्व प्रकल्पांना मार्गी लावण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.


सरकारमधील नोकरशाहीचाही त्यांनी आपल्या भाषातून समाचार घेतला.. घटनेने लोकहिताचे निर्णय घेण्याचे आधिकार लोकप्रतिनिधींना दिलेत मंत्रालयातील सेक्रेटरींना नाही अशा शब्दांत त्यांनी नोकरशाहीचा समाचार घेतला. लोकहिताचे निर्णय घेतना कोणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही असं ते म्हणाले.