डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत.
डोंबिवली : डोंबिवलीच्या एमआयडीसीतील फेज २ परिसरातील हार्बट ब्राऊन केमिकल कंपनीत मोठा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत तीन जण ठार झालेत तर ३७हून अधिक जण जखमी झालेत.
या स्फोटामुळे तेथील चार ते पाच किमी परिसरातील स्फोटाचे हादरे जाणवले. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच कानामध्ये दडे बसतील इतका मोठा आवाज जाणवला.
डोंबिवलीतील ही दुर्घटना दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. स्थानिक नेत्यांशी आम्ही संपर्कात असून युद्धपातळीवर बचावाचे काम सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.