मुंबई : अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. याप्रकरणातला प्रमुख आरोपी संतोष भवारच्या फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदेंचा फोटो व्हायरल होत असल्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी मात्र राम शिंदेंसोबत असलेली व्यक्ती आरोपी नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसंच विरोधकांनी राम शिंदेंची बदनामी केल्यानं माफी मागावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी यावं, यासाठी विनंती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.


हे सरकार सैराट असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडे कोणताही विषय नसल्यानं ते अजूनही सैराटमध्येच अडकले अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.