पिंपरी-चिंचवड : राज्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार यश मिळालं आहे. राज्यात भाजपचे एकूण 51 नगराध्यक्ष निवडून आले आहेत तर 3510 जागांपैकी तब्बल 851 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.


नगरपालिकांप्रमाणेच महानगरपालिकांच्या निवडणुकीतही एक नंबरवर राहू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकांचा हा निकाल म्हणजे मोदींनी नोटबंदीबाबत घेतलेल्या निर्णयाला सगळ्यांनी समर्थन दिल्याचं स्पष्ट असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.