`मुख्यमंत्र्यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत`
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मुख्यमंत्री सगळ्यांचा कुंडल्या आपल्याकडे आहेत म्हणतात मग अशांतता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना का घेता असा सवालही नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे व्यावसायिकांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला आहे.