नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची साडेसाती कायम आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नाही. आणखी तीन महिने तरी ते कमबॅक करु शकणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर खडसे यांना मंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर खडसे यांच्या मागी शुल्ककाष्ठ कायम आहे. आपलेच काही लोक याला जबाबदार असल्याचे सांगणारे एकनाथ खडसे यांची साडेसाती संपताना दिसतच नाही.


भोसरी वादग्रस्त जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याकरता स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीचे चौकशीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी या समितीने आणखी तीन महिन्यांची मुदत वाढ मागितली आहे. 


चौकशी पूर्ण होत नाही तोवर खडसेंचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार नसल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. खडसे यांना दोन प्रकरणात क्लिनचीट मिळालाय. मात्र, जमीन घोटाळ्यात त्यांच्यावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. त्यातच चौकशी समितीने तीन महिन्यांचा वाढीव कालावधी मागितल्याने आता तीन महिने तरी ते मंत्रिमंडळात कमबॅक करु शकणार नाहीत.