यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेसाठी मतदान सुरु असताना दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने शहरातील पाटीपुरा भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.  त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया देखील प्रभावित झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस पथकाने वेळीच जमावावर लाठीमार करून जमावाला पांगविल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. यवतमाळ शहराच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळेतील मतदान केंद्रापुढे दोन अपक्ष उमेदवारांच्या गटात हा राडा झाला. 


यात महिलामध्ये जोरदार मारामारी झाली. पोलिसांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशीही झटापट करण्यात आली त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.  याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी दोन्ही गट गेले मात्र तक्रार न करताच ते परतले.