पुणे : भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ऐन वेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्याआधी  भाजपचे उमेदवार सतीश बहिरट यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता. आणि आता सतीश बहिरट आपली उमेदवारी मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे कुणाचा अर्ज बैध ठरतो याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 
निवडणूक निर्णय अधिकारी थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत. अगदी अशीच परिस्थिती धंगेकरांच्याबाबतीत निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रभागात काँग्रेसकडून अस्लम बागवान यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रवी धंगेकर यांनीही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


त्यामुळे दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्याबाबतची सुनावणीदेखील सुरू आहे. त्याशिवाय शिवाजीनगर प्रभागात भाजपच्या ज्योत्सना सरदेशपांडे आणि ज्योत्सना एकबोटे यांच्या उमेदवारीवरुनदेखली असाच पेच निर्माण झालाय. दोघांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला आहे.