कोल्हापूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनगडावर अतिक्रमण करुन बांधलेलं घर इतिहासप्रेमींच्या दबावामुळे पन्हाळा नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी पाडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पुरातत्व विभाग आणि प्रशासनाला अंधारात ठेवत काही लोकांनी पन्हाळ्याचा उपदुर्ग असणा-या पावनगडावर अतिक्रमण करत बांधकाम केलं होतं. वारंवार समज देऊनही संबधित व्यक्तीने बांधकाम उतरवलं नव्हतं. त्यामुळं संतप्त शिवप्रेमींनी गुरुवारी पावनगडावर धाव घेतली. 


शिवप्रेमींचा आक्रमकपणा पाहून पन्हाळा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कर्मचा-यांचा फौजफाटा बोलावून अतिक्रमण पाडून टाकली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता