पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मॅचवर बेटींग प्रकरणी नगरसेवकाला अटक
कोल्हापूर महानगरपालीकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटींग प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पोलिसांनी कोल्हापूरातल्या सम्राटनगर इथं छापा टाकला. या सामन्यावर बेटिंग घेणारे तेजु महाडीक आणि अमित बुकशेट यांना मुद्देमालासह अटक केली.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालीकेचे स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटींग प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पोलिसांनी कोल्हापूरातल्या सम्राटनगर इथं छापा टाकला. या सामन्यावर बेटिंग घेणारे तेजु महाडीक आणि अमित बुकशेट यांना मुद्देमालासह अटक केली.
चौकशीअंती या दोघांनीही नगरसेवक मुरलीधर जाधव आणि अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरुन बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मुरलीधर जाधव हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक असुन गेल्या वर्षी विरोधी पक्ष नेता असतानाही बेटिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मुरलीधर जाधव बेंटिगमध्ये अडल्यामुळं कोल्हापूर महानगरपालीकेत खळबळ माजली आहे.