रत्नागिरी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करोडो रूपयांची कामं करण्यात आली. मात्र यातील काही कामं फक्त कागदावर दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी कामं करण्यात आली ती नित्कृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमत करून या कामांची बिलंही काढल्याचा आरोप करण्यात येतो आहे. बंधारे काँक्रीटचे असणं आवश्यक असताना इथे मात्र जांभा दगडाचे बंधारे बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे.याच भ्रष्टाचाराबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पुरावे देणार असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे.


रत्नागिरीच्या खेडम-दापोलीमध्ये जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्वतः कामाची पाहणी करणार असल्याचं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय. या कामात काही त्रुटी, अपहार आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.


पाहा व्हिडिओ