कोरड्या विहिरींमध्येही साचलाय `भ्रष्टाचारा`चा गाळ!
गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यामधल्या आलेवाडा या गावात सिंचन विहिरीच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यामधल्या आलेवाडा या गावात सिंचन विहिरीच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय.
या प्रकरणात दोषी असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केलीय. आलेवाडा गावातल्या नऊ शेतकऱ्यांना सिंचन विहिरीची मान्यता मिळाली होती. या विहिरींचं काम रोजगार हमी योजनेनुसार स्थानिक मजुरांच्या माध्यमातून करायचं होतं.
मात्र, प्रत्यक्षात आलेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी आपल्या मर्जीतल्या लोकांना या विहिरी मंजूर करून दिल्या.
विशेष म्हणजे या बांधकामला प्रशासकीय मान्यता मिळण्याआधीच, एका कंत्राटदाराला प्रती विहीर तीन लाख रुपये याप्रमाणे कंत्राट देऊन हे काम पूर्णही करून घेतलं.
या प्रकरणी संबंधित अधिकारी कुठलंही भाष्य करायला तयार नसून, जिल्हा प्रशासनानं यात लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करताहेत.