शिर्डी : प्रेमीयुगलाने शिर्डीत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रेमी युगूलाची काही महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इगतपुरीचा २५ वर्षाचा कैलास गाढवे तर २० वर्षाची कोमल कदम ही तरूणी रायगडची होती. कैलास आणि कोमल दोघेही गेल्या १ मार्च पासून घरून बेपत्ता होते.


शिर्डीतील हेडगेवार नगरमध्ये हॉटेल हरजीवनमध्ये या युगलाने विष प्राशन केल्याची माहिती पोलिसाना रात्री साडेनऊ वाजता मिळाली. यात आधी कोमलचा तर नंतर कैलासचा मृत्यू झाला. 


मृत्यूपूर्वी या प्रेमी युगलाने कॉमन सुसाईड नोट लिहिली होती, त्यात आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत आहोत, यास कुणालाही जबाबदार धरू नका, आम्ही माफीला लायक नाहीत, अशी खंतही लिहिण्यात आली होती, या सुसाईड नोट वर दोघांच्या सह्या आहेत.