लातूरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरखाली एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या चाकूरजवळ घडलीय.
लातूर : औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरखाली एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या चाकूरजवळ घडलीय.
३० वर्षीय वाल्मिकी चिटमपल्ले आणि २० वर्षीय अर्चना घुगे अशी या जोडप्याची नावं. वाल्मिकी विवाहीत होता.
आपल्या प्रेमाचा स्वीकार कुटुंबिय करणार नाहीत म्हणून हे दोघे काही दिवसांपूर्वी पळून गेले होते. मुलीच्या वडिलांनी १ जूनला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या प्रकरणी आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करतायत.