लोणावळा : दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण गुन्हेगारी घटनांमुळे सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू भेगडे यांच्या खुनाचा कट उघडकीस आला. त्यांनतर काही दिवसातच तळेगावचे माजी नागराध्यक्ष भाजपचे सचिन शेळके यांचा दिवसाढवळ्या खून झाला. 


त्यातच आता, जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून, लोणावळ्याच्या नगराध्यक्षांची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.