खेड : संदीप सावंत मारहाण आणि अपहरणप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. खेड सत्र न्यायालयाकडे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामीन अर्ज फेटाळल्यामुळं निलेश राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. 


काँग्रेसचे चिपळूणचे तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण आणि अपहरण केल्याचा प्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान निलेश राणे उद्या हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत.