रत्नागिरी : शहराजवळील कर्ला गावात तोडण्यात आलेल्या कांदळवनांबाबत वन विभागाच्या एका टीमने जागेवर जाऊन पाहाणी केली. झी २४ तासने हे वृत्त प्रसारीत केलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने धावाधाव सुरू केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित महसूल विभागाकडून जागेवर जाऊन पाहाणी केली आणि त्याचा अहवाल तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला. या अहवालानंतर रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांना सादर केल्यानंतर वन विभागाकडे याची पडताळणी करण्यासाठी प्रांताधिका-यांनी तो अहवाल पाठवला. वन विभागाच्या टीमने जागेवर जावून पाहाणी केली आणि तोडलेली झाडं ही कांदळवनचं असल्याचा दावा वनविभागाने केलाय. त्यामुळे आता यासंदर्भात रत्नागिरी प्रांताधिकारी काय करवाई करतात याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहीले आहे.


रत्नागिरी येथील कर्ला भंडारवाडीत सुमारे एक एकर परिसरात कांदळवनांची बेसुमार तोड होत असल्याचा प्रकार स्थानिकांनी उघड केला होता आणि त्यासंदर्भात आता प्रशासनाकडून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वनविभागाने देखील आपला अहवाल प्रांताधिका-यांना पाठवला आहे.