मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड
अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय.
सिंधुदुर्ग : अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय.
मान आणि पंजे तोडलेल्या अवस्थेत या बिबट्याचं धड तिलारी नदीत पाण्यावर तरंगताना आढळलं.
या बिबट्याची हत्या नखांसाठी आणि दातासाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
दोडामार्ग भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या क्रूर हत्येनं एकच खळबळ उडालीय.
वन खातं याबाबत अधिक चौकशी करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.