कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. 


वडगावच्या सनी पवारचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक बबन शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील हे पोलीस अधिकारी दोषी आढळले. त्यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावलाय.