ठाणे : कळव्यातल्या दीपक पाटील खून प्रकरणात बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारी यांच्यासह सर्व ६ आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी राजा गवारी, गँगस्टर सुजीत सुतार, नितीन वैती, अतुल देशमुख, जयदीप साळवी आणि राजा ठाकूर या आरोपींना ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


२०११ मध्ये कळव्यात दीपक पाटील यांचा खून करण्यात आला होता. दरम्यान राजेश गवारेला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर अन्य पाच जणांची रवानगी आधारवाडी जेलमध्ये करण्यात आलीय. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर कळवा पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं.