धुळे : पावसाने पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणी शेतक-यांनी केली. या मागणीसाठी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, जिल्हाधिका-यांनी शेतक-यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलक शेतक-यांनी आक्रमक झाले. अखेर या संतापाचा उद्रेक झाला आणि शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दगड़फेक केली. त्यानंतर पोलिसांनी थेट शेतक-यांवर लाठीचार्ज केला. मात्र एवढ्यावरच पोलिसांनी आपली कारवाई थांबवली नाही तर शेतक-यांचा पाठलाग करून त्यांना बडवून काढायला सुरूवात केली.


पाण्याच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना लाठ्यां-काठ्यांचा मार खावा लागला. यासंदर्भात झी 24 तासनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलं. तसंच पुढच्या 10 ते 12 दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडणवार असल्याची घोषणाही त्यांनी झी 24 तासशी बोलताना केली.