पिंपरी-चिंचवड - तुम्ही कधी नातवाला आजी आजोबांच्या लग्नाला हजर राहिलेले पाहिलंय. किंवा सुना सासू सासऱ्यांचे लग्न एन्जॉय करतायेत हे पाहिलं आहे का? पिंपरी-चिंचवडमध्ये हे घडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडच्या सांगवीमधल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हा अनोखा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. लग्नाला 50 वर्षं झालेल्या तब्बल 11 जोडप्यांचा या सोहळ्यात मोठ्या थाटात पुन्हा एकदा विवाह साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अर्थातच या आजी आजोबांची मुलं मुली, जावई सुना आणि नातवंड तर काही पतवंडंही हजर होती. ही अनोखी लग्न लागल्यानंतर, अंगठी शोधणं, एकमेकांवर पाणी उडवणं, परस्परांना घास भरवणं हेही हसतखेळत पार पडलं. 


संसाराचा एवढा प्रदिर्घ अनुभव असलेल्या या 11 जोडप्यांनी संसार सुखाचा कसा करायचा याचं गमकही नव्या पिढीला यावेळी आवर्जून सांगितलं. या आजीआजोबांच्या जावई सुना आणि नातवंडांकरता हा सोहळा विशेष प्रेरणादायी ठरला. 


विवाहसंस्थेचं महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी हा अनोखा सोहळा आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितलं. असंख्य भल्याबुऱ्या प्रसंगांना जोडीदाराच्या साथीनं सामोरी गेलेली ही जोडपी. त्यांचा अनुभव आणि हा सोहळा सारंच अद्भूत.