रत्नागिरी : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात पावसाचा जोर कायम किनारपट्टीतील अनेक भागांना पावसाने रात्र भर झोडपून काढले आहे. कोकणातील नद्या दुथड़ी भरुन वाहत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या माती बाजूला करून हा महामार्ग सुरु करण्यात आला आहे मात्र, पाऊस असाच राहिला तर हा महामार्ग कधीही  बंद होऊ शकतो.


परशुराम घाटात दोन दिवस दरड़ कोसळत असल्यामुळे पोलीस प्रशासनानी बंद केला होता. तर दुसरीकड़े गेल्या १० तासापासून बंद असलेला चिपळूण कराड मार्ग हा एकेरी वाहातुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. तर रेल्वेही  मुसळधार पावसामुळे धीम्या गतीने सुरू आहे.