औरंगाबाद : मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फूट पाडू पाहत आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केला आहे. मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील संयोजन समितीने औरंगाबादेत दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनावर मराठा समाज क्रांती मोर्चा काढणार असून आम्ही आमच संयम सोडणार नसून आतापर्यंत ज्या मार्गाने मोर्चा निघाला. तसाच मोर्चा निघेल, सोशल मीडियावर फिरत असलेल्या चर्चा चुकीच्या असून मोर्च्याची दिशा बदलण्याचे काम काहीजण करत आहे. पण तसे काही होणार नाही, याची ग्वाही संयोजन समितीने दिली आहे. 


मार्चपर्यंत समाजाच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर दिल्लीमध्ये दोन लाख मराठे आंदोलनाला बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. संभाजी ब्रिगेडने आपला पक्ष जरी स्थापन केला असला तरी त्यांची ध्येय धोरण जाहीर होईपर्यंत त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने सांगितले.


दरम्यान,  मराठा समाजा पाठोपाठ आता OBC समाजाने देखील आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्च्याच्या मार्ग अबलंबलाय आहे. यानिमित्ताने नागपुरात विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्च्याचे आयोजन करण्यात केले आहे. ८ डिसेंबरला या मोर्च्या काढण्यात येणार आहे.