नागपूर : सहप्रवाशांची झालेली तोंडओळख आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास एका महिलेला चांगलाचा महागात पडलाय. राजस्थानातून चंद्रपूरला निघालेल्या एका रामेश्वरी मेघवाल यांच्या दोन वर्षांच्या मुलीचं नागपुरात अपहरण करण्यात आलंय.


आणि अपहरणकर्त्यांनी डाव साधला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषीय रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. बिकानेर-बिलासपूर एक्स्प्रेसने नागपूरला पोचलेल्या रामेश्वारीला चंदपूरला जायचे होते. प्लाटफॉर्म क्रमांक ६ वर गाडी आल्यावर गाडी सुटण्याकरिता वेळ असल्याने ती विरंगुळाकरिता जया नावाच्या २ वर्षांच्या आपल्या मुलीसह डब्ब्यातून खाली उतरली. रामेश्वरी पाणी पिण्याकरिता गेली असता तिचे थोड्यावेळाकरिता जयाकडे दुर्लक्ष झालं. आणि अपहरणकर्त्यांनी डाव साधला. 


मुलीचे अपहरण सीसीटीव्हीत कैद


स्टेशनवर लागलेल्या CCTV कॅमेऱ्यात मुलीचे अपहरण कैद झाले आहे. एकीकडे रेल्वे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे स्वतः देखील आपल्या मुलीच्या शोध घेण्याकरिता वणवण फिरते आहे. रेल्वेत गुंगीचं औषध देऊन दागिने चोरण्याचे प्रकार नेहमीचं घडत असतात. पण या अपहरणाच्या घटनेनं रेल्वे पोलिसही गोंधळात पडलेत.