डोंबिवली : शहरातील महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका रूग्णाच्या मित्रांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकालाही बेदम चोपले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र डॉक्टरला वाचवण्यासाठीमध्ये पडलेल्या सुरक्षा रक्षकाला या मद्यपींनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे दादाजी पवार आणि दत्ता माळेकर हे रिक्षाचालक आहेत. यातल्या एकाला अटक करण्यात आली आहे.


दोघेही रिक्षाचालक भाजपच्या रिक्षा युनियनचे सदस्य असून त्यातला एक युनियनचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. काल रात्री झालेल्या या प्रकाराविरोधात रूग्णालयातल्या कर्मचारी वर्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.