डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर
`प्रोबेस` या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर पोहोचलाय.
डोंबिवली : 'प्रोबेस' या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर पोहोचलाय. या स्फोटात एकूण १८३ व्यक्ती जखमी झाल्या असून कंपनीचे मालक वाकटकर यांचे दोन्ही पुत्र सुमीत, नंदन आणि सून स्नेहल यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.
या दुर्घटनप्रकरणी प्रोबेस कंपनीचे मालकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी ढिगारा उपसताना रसायनांची गळती होऊन त्रास होऊ नये, यासाठी ५०० मीटर परिसरातील लोकांना घरे सोडून तात्पुरते स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते.
या स्फोटाची इतकी भीषणता होती की, स्फोटामध्ये प्रोबेस कंपनी पूर्णपणे नष्ट झाली असून, शेजारच्या एकूण २४ कंपन्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूटाचा खड्ड पडला आहे.
पाहा मृतांची नावे