डोंबिवली : येथील एमआयडीतील ज्या प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. त्या घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटरवरच्या परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या स्फोटानंतर अजून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. हा ढिगारा हटवताना कुठलाही धोका पोहोचू नये, यासाठी संबंधित परिसरातली घरं रिकामी करायला सांगितली आहेत. या स्फोटा ६ ठार तर १६० जण गंभीर जखमी झाले असून ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


डोंबिवलीत केमिकल कंपनीतील बॉयरल स्फोटानंतर घर, दुकानांच्या खिडक्यांच्या काचा, तावदानं तुटली, रस्त्यावर धुराचे लोट आले आणि भयानक मोठ्या आवाजाने नागरिक रस्त्यावर सैरावैरा धावू लागले होते. काय झाले ते कोणालाच समजत नव्हते. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. डोंबिवली पूर्वेसोबत पश्चिमेतल्या इमारतींनादेखील या स्फोटाचा धक्का जाणवला होता.