ठाणे : पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलेय. ब्रम्हांड परिसरातील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सोसाटीतील एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ज्येष्ठ नागरिक सीताराम श्रॉफ यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना मारण्यात आलंय. तर त्यांची काळजी घेणाऱ्या संतोष याच्या डोक्यावर धारधार हत्यारांनी वार करुन हत्या करण्यात आलेय.


घोडबंदर येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


दरम्यान, याआधी कासारवडवली येथे आपल्याच कुटुंबातील १४ जणांची हत्या हसनैन वरेकर याने केली होती.