नाशिक : लैला खान हत्याकांडामुळं चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीत पुन्हा एकदा बारबाला पार्टीनं खळबळ उडवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथल्या हाय प्रोफाईल मिस्टिक व्हॅलीत काही बड्या पोलीस अधिका-यांची मुलं बारबालांना नाचवत, नशापान करत होते. पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पार्टी करणा-या 13 जणांना अटक केली.


पृथ्वीराज युवराज पवार, सुमित देवरे, कौस्तुभ जाधव, सुशांत गांगुर्डे, ललीत पाटील, शब्बीर खान, जिंनतबी हनिफ, राजिया शेख, अंजना मंडल शहनाझ शेख, चिंनामा अंजालिया दनिया, रेहाना सुलताना आणि धर्मेंद्र सिंग, अशी आरोपींची नावे आहेत. पण उच्च स्तरावरून दबाव आल्याने त्या सगळ्यांना तात्पुरता जामीन देऊन प्रकरण दडपण्यात आले.