बीड :  राज्यात एकीकडे बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना असे प्रकार करणाऱ्या आरोपीना जरब बसेल असा निकाल माजलगाव न्यायालयाने दिलाय, धारूर तालुक्यातील चोरांबा येथील दुहेरी खून आणि बलात्कार प्रकरणी दोन आरोपीना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे,या निकालामुळे अशा घटना करणार्यांना धडा मिळेल असे म्हणण्यास हरकत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारुर तालुक्यातील चोरंबा येथील मायलेकीच्या दुहेरी हत्याकांड व बलात्कारप्रकरणी आरोपी कृष्णा रामराव रिडडे व अच्युत उर्फ बप्पा उर्फ बाबु कचरु चुंचे रा. चोरंबा या दोघांना माजलगांव येथील सत्र न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी दोषी करार केले असून, दोघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.


चोरंबा येथे 28 मे 2015 रोजी 45 वर्षीय महिलेचा गळा दाबुन खून केला व तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचाही गळा दाबुन निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दिनांक 29 रोजी धारुर पोलीसांत कलम 449 , 354 ब , 376(2)(आय) , 302 सह कलम 34 भादंवि व कलम 4 बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


माजलगांव येथील जिल्हा सत्र न्यायाधिश एम.व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात आरोपितांविरध्द दोषारोप पत्र दाखल झाले होते. हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवुन दिनांक 16 आॅगस्ट रोजी वरील दोन्ही आरोपींविरुध्दचे आरोप सबळ पुराव्यानिशी सिध्द झाले असुन आरोपीना न्यायालयाने शिक्षेबददल विचारले असता त्यांच्या वकीलाने शिक्षेबाबत सांगण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागुन घेतल्याने आरोपीतांना शिक्षा देतांना त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. त्यानंतर आज बुधवारी दुपारी तीन वाजता शिक्षा सुनावण्यात आली. 


सदर प्रकरणी सहाययक सरकारी वकील अ‍ॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड. बी.एस. राख, अ‍ॅड. आर.ए. वाघमारे यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान माजलगांव न्यायालयात आज दिवसभर मोठया प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती त्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.