मुंबई : राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


फेब्रुवारी महिन्यातच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असं सहारिया यांनी नागपूर दौऱ्यावर स्पष्ट केलं होतं. त्याशिवाय नेहमी मंगळवारी म्हणजे आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक या आठवड्यात सोमवारीच घेण्यात आली. त्यामुळे आज महापालिका आणि निवडणुकांची घोषणा होईल या शक्यतेला आणखी बळ मिळालंय.