मुंबई : भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावणे चारशे कोटीच्या कर्जवसुलीसाठी अखेर जप्ती करण्यात आलीय. कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय.


तारण ठेवलेला देवदैठणचा दुसरा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातील माऊली निवासस्थानही जप्त होण्याची शक्यता वर्तवली जातेय.


शेतकर्‍यांच्या थकीत ३५ कोटींसाठी सरकारनं यापूर्वीच जप्तीची कारवाई केली होती. मात्र त्यास कारखान्यानं उच्च न्यायालयात दाद मागितली होती... तर थकबाकी न भरल्यानं २३ मार्चला बॅकेनं प्रतिकात्मक ताबा घेतला होता.