औरंगाबाद : येत्या खरीप हंगामा पासुन शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोदावरी नदीपात्राच्या कडेच्या चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचाही नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय हे शेतकरी घेताय.


 तीन एप्रिलला अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावापासुन या एल्गारांची सुरवात होत आहे. आंदोलनं करुनही मात्र शेतकऱ्यांच्या नशीबी निराशाच आहे 
 
 दुसरीकडे व्यावसायिक आणि नोकरदार कामबंद संप करुन आपले प्रश्न सोडवतात. त्या मुळे आता शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत  आमच्या शेतीत आम्ही फक्त आमच्या साठीच पिकवणा असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय