नांदेड: मंत्रालयासमोर विष प्राषन केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतक-याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपुर्वी या शेतक-याने मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधव कदम हा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जाणापुरी येथील अल्पभुधारक शेतकरी होता. नैराश्येपोटी 18 डिसेंबर 2015 रोजीही माधव कदम यांनी मंत्रलयासमोर विष प्रश्न करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  माधव कदम यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरले होते. पावसा अभावी पीक गेले. 


सरकारने दुष्काळ जाहीर करुन सर्वे केला. पण माधवच्या शेतात सोयाबीन असतांना कापुस असल्याचा सर्व्हे रिपोर्ट आला. शासमाने जाहीर केल्यानुसार माधवला एकरी सहा हजार आठशे रुपयांच अनुदान मिळायला पाहीजे होते... पण त्यांच्या बॅंक खात्यात फक्त साडेचार हजार रुपये जमा झाले. 


बॅंक अधिकारी, तलाठी आणी कृषी अधीका-याला देखिल त्यांनी या बाबतीत विचारना केली होती... त्यानंतर माधव जिल्हाधीका-यांकडे सुद्धा गेला... पण समाधान न झाल्याने जिल्हाधीकाऱ्यांसमोरच आपण मंत्रालयात जाऊन विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते, असा दावा त्याचे नातेवाईक आणी गावक-यांनी केलाय. 


आपण आत्महत्या करणार असल्याचे त्याने प्रशासकीय अधिका-यांना सांगितले पण दखल घेण्यात न आल्याने त्याचा बळी गेला असा गावक-यांचा आरोप आहे.