शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!
लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो.. मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर : लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो.. मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
लग्न म्हंटलं की लग्नात मान-पान, टॉवेल-टोपी, फेटे देवून लग्नात येणा-या पाहुण्यांच स्वागत केलं जातं.. मात्र जुन्नर तालुक्यातील मेहेत्रे कुटुंबाचं लग्न याला अपवाद ठरलंय.. अक्षय़ मेहेत्रेच्या लग्नात श्रीफळ नारळाऐवजी पेरुची रोपं देवून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं..
मेहेत्रे कुटुंबांची लग्नात रोपं देवून स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी दहा वर्ष अगोदर त्यांच्या मुलीच्या लग्नात केशरी आंब्याची रोपं वाटून पाहुण्यांच स्वागत केलं होतं.. पंतप्रधानांनीही त्यांच्या मन की बातमधून या उपक्रमाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता अक्षय आणि पुजा रसाळ यांच्या लग्नात रोपं दिल्यानं चोहुकडून त्यांच्यावर कौतुकाच्या अक्षदा पडता आहेत.
ऐरवी लग्न सत्कार समारंभात लाखोंची उधळण करणा-यांना आपण पाहिलं आहे. मात्र या वारेमाप पैशांची उधळण करणा-यांनी मेहेत्रे कुटुंबीयांचा आदर्श घेतला तर पर्यावरणाचा -हास थांबण्यास मदत होईल. आणि सगळ्यांचं आरोग्यमानही ठणठणीत राहिलं.