शिर्डी : निळवंडे धरणातल्या कालव्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी, शेतक-यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला. उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय. मात्र या कालव्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागल्या तीन वर्षांत, सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.


मागील तीन वर्षांत फडणवीस सरकारनं दुष्काळग्रस्तांची अवेहलना करत अवघा 13 कोटींचा निधी दिला, तर यावर्षी 46 कोटी दिल्याची फक्त घोषणा केली. विशेष म्हणजे या कालव्यांच्या निधीसाठी मंत्र्यांनी विधानसभेत आश्वासनं देऊनही अजून ठोस कृती झालेली नाही.