जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे शेतकरी संघर्ष यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जळगाव ग्रामीण मतदार संघातल्या १० ते १२ गावांमधले सुमारे शंभर शेतकरी यावेळी बैलगाडी घेऊन, या संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर या बैलगाडी रॅलीत सहभागी झाले. 


ही संघर्ष यात्रा पारोळा, अमळनेर, बेटावद मार्गे आज धुळे जिल्ह्यात पोहोचणार आहे. दरम्यान नारायण राणे हे सुद्धा या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होतील असा विश्वास, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.