जमिनीवर पाणी सांडले म्हणून मुलाची हत्या
जमिनीवर पाणी का सांडले म्हणून संतापून एका ३० वर्षाच्या व्यक्तीने आपला मुलाला बेदम मारहान केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीये.
नागपूर : जमिनीवर पाणी का सांडले म्हणून संतापून एका ३० वर्षाच्या व्यक्तीने आपला मुलाला बेदम मारहान केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीये.
धर्मेंद्र डोंगरे असं या नराधम बापाचं नाव आहे. मुलाच्या हातातून पाणी जमिनीवर सांडले म्हणून या बापाने त्याला इतकं मारल की त्यात त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.
नागपूरच्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केलीये.