बायकोसोबत भांडण झालं म्हणून...
उल्हास नदीपात्रात नऊ वर्षांच्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तुळशीराम सैनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
बदलापूर : उल्हास नदीपात्रात नऊ वर्षांच्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तुळशीराम सैनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
धक्कादायक म्हणजे, बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तुळशीरामनं आपल्या चिमुरडीला उल्हास नदीत फेकून दिलं होतं.
गेल्या गुरुवारी, एकता सैनी या सहा वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांनी चप्पल घेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेलं आणि या पुलावर आणून पुलाखाली फेकून दिलं. मात्र नदीवर तरंगणा-या जलपर्णीमुळे ही मुलगी पाण्यात बुडाली नाही. रात्रभर ती त्या जलपर्णीवर बसून राहीली. अखेर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गावक-यांना तिच्या हाका ऐकू आल्या आणि गावक-यांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने तिला बाहेर काढलं.
ही मुलगी ठाण्याच्या वर्तक नगरातील आहे आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईने अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता.