औरंगाबाद : सकाळी दुचाकी बाजुला करण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरत पाच ते सहा जणांनी तरुणाला दुसऱ्या दिवशी गाठून तलवारीनेमारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्रिमुर्ती चौकात हा प्रकार घडला. भर दुपारी पाच ते सहा जण हातात तलवारी घेऊन पळत असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशीरा सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख हफिज, शेख सुलतान, तुषार साळवे, आनंद नागलोत, प्रदिप म्हस्के, वशेख हफिज  आरोपींची नावं आहेत. संदिप दत्तात्रय डहाळे हा विष्णुनगर मध्ये भाडेतत्वावर राहत होता. १८ जानेवारी रोजी तो घर बदलत असल्याने सामानाचे ने आण करताना  परिसरातच रस्त्यात दुचाकी लावल्याने संदिपचा गोरु नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर इतरांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता संदिप काही कामानिमित्त त्रिमुर्ती चौकात उभा होता. 


यावेळी अचानक आरोपी हातात तलवारी घेऊन त्याच्या दिशेने धावत येत होते. हातात तलवारी घेऊन मलाच मारायला येत असल्याचे संदिपच्या लक्षात येताच संदिप जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पळायला लागला. तुला आज  जिवंत सोडणार नाही, असे म्हणत आरोपी संपूर्ण भागातून हातात तलवारी घेत पाठलाग करत होते. 


यावेळी संदिप ने तत्काळ काही दुकानात जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यात संदिपच्या पाठीवर तलवारीचे वार झाल्याने खोल जखम झाली. परंतू तो दुकानात गेल्याने व मोठा जमाव जमायला लागल्याने आरोपी फरार झाले. आरोपींपैकी शेख हफिज हा भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा शहर जिल्हाध्यक्ष आहे.