नाशिक : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी नाशिकच्या शिंदे हौस्पिटलवर फौजदारी कारवाई करण्यात आलीय.  हॉस्पिटल सील करण्यात आलय.  तर डॉक्टर कारागृहाची हवा खातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होमियोपॅथीची डिग्री असलेल्या बळीराम शिंदेने नाशिकच्या  मुंबईनाका परिसरात आणि ओझर गावात मोठं हॉस्पिटल थाटलं होतं.  


गर्भलिंग निदान कायद्याने बंद असतानाही डॉ. शिंदे सररास गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत होता.  अशाच एका प्रकरणात त्याला अटक आकरण्यात आली असून कुठल्याही स्वरुपाची भूल न देता त्याने ओझरच्या हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात केला. त्या महिलेची परिस्थिती गंभीर झाल्याने तिला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. 


महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सुमोटो कारवाई करत मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली. या कारवाईनंतर शहरातली इतरही अनधिकृत हॉस्पिटलं प्रशासनाच्या रडारवर आली आहेत.