पुणे : तू मेरी ना हो सकी, तो किसी और की भी ना होने दूंगा...हे वाक्य अनेकदा बॉलीवूडमधील खलनायकाच्या तोंडी तुम्ही ऐकलं असेलं. मात्र रिअल लाईफमध्ये असंच काहीसं घडलंय आणि हे घडवून आणलंय ते खलनायकाने नव्हे तर खलनायिकेने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकर दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे समजल्यानंतर पहिल्या प्रेयसीने त्याच्या लग्नाचा मंडपच जाळून टाकल्याची धक्कादायक घटना पुण्यात ही धक्कादायक घटना घडलीये.


दीपक रेणुसे असे या तरुणाचे नाव आहे. दीपकचे ३० वर्षीय घटस्फोटिता सुषमा टेमघरे हिच्याशी प्रेमसंबंध होते. दीपकचे १८मे लग्न होते. दीपक दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे समजल्यावर सुषमाने दीपकच्या घरासमोरील मंडपच जाळून टाकला. 


यावेळी पोलीस चौकशीदरम्यान दीपकने आपल्याला सुषमाने धमकी दिल्याचे सांगितले. त्यामुळे पहिला संशय सुषमावर होता. याप्रकरणी अधिक चौकशी केली असताना सुषमानेच हे सगळे घडवून आणल्याचे मान्य केले. 


या घटनेनंतर सुषमा तेथून पसार झाली होती. मात्र काही काळाने तिला अटक करण्यात आली. गुरुवारी तिला कोर्टात हजर केले असताना पोलिसांनी शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये.