पुण्याच्या विश्रांतवाडीत गादीच्या कारखान्यात आग
पुण्याच्या विश्रांतवाडीतल्या शांतीनगरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झालाय. शांतीनगरमध्ये काही दुकानांना आज सकाळी आग लागलीय.
पुणे : पुण्याच्या विश्रांतवाडीतल्या शांतीनगरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झालाय. शांतीनगरमध्ये काही दुकानांना आज सकाळी आग लागलीय.
आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशन दलाचे चार बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
सुमारे ३००० स्केवर फुटावर ही आग पसरलीये. मृत्यू झालेली व्यक्ती गादीच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करत असे.