मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याची घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बस मुंबईहून पुण्याला जात होती. बोरघाट परिसराजवळ पोहचल्यानंतर अचानक आग लागली. गाडीतून धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर सर्व प्रवासी तात्काळ गाडीतून खाली उतरले.


शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येतंय. या आगीत पूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. 


सुदैवाने यात कुणीही जखमी नाही तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात देवदूत, आयआरबीला यश आलंय. 


पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे. गुजरात राज्य पासिंगची ही बस असून बसमध्ये 14 प्रवासी होते.