पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद घरात अचानक आग लागल्याचे प्रकार पुण्यात वाढलेत. मागल्या दहा दिवसांत पुण्यात आगीच्या १५० घटना घडल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळा आणि हिवाळ्यात पुण्यात दररोज आगीचे पाच ते सहा कॉल येतात. मात्र उन्हाळ्याच्या हंगामात मार्चपासून ही संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. विशेष म्हणजे यातल्या बहुतेक आगी बंद घरात लागल्या आहेत.


सुट्टीवर जाताना सुरुच ठेवलेला विजेचा मेन स्विच, फ्रीज अथवा गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर किंवा अगदी कचरा सुद्धा आग लागण्याचं निमित्त ठरतं. त्यात रणरणतं उन नेमकं तेल ओतण्याचं काम करतं. म्हणून योग्य खरबरदारी घेण्याचं आवाहन, पुणे अग्निशमन दलानं केलंय.